(Anjali Damania) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अपर मुख्य सचिव विकास खारगेंच्या मंत्रालयातील दालनात भेटीला गेल्या होत्या. अंजली दमानिया त्यांच्या कडील लेखी पुरावे खारगेंसमोर सादर केल्या. याप्रकरणी सर्वोच्च शंका लेखी स्वरुपात विचारणार आल्या. सर्व शंकांची लेखी उत्तरे समितीकडून मागणार आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, "आज खरगे समिती पुढे मी सगळ्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या या जमिनीचा फक्त सेलडीड व्यवहार नाही. मी त्यांना स्टेशन डायरी आणि इतर बाबी व्यवस्थित सांगितल्या. मी त्यांना पार्टनशिप आणि इतर सगळ्या ॲक्ट बाबत माहिती दिली. मी ९८ पानाचे सबमिशन केले. 22 ला रेझ्यूलेशन केले, नंतर त्यांनी एओसी मागितली. नंतर त्यांनी सेलडीड केली फक्त अमेडीया एन्टरप्राईजेज, दिग्विजय पाटील यांच्या नावावर एफआयआर होणे योग्य नाही. पार्थ पवारचे नाव त्यात असायला हवे.एखादा फ्रॅाड जर पार्नटनशीप टमध्ये झाला असेल तर तो इतर पार्टनरवर त्या सगळ्यांवर लागू होतात. मी त्यांना सांगितले की यात काय काय झालं आहे."
पुढे त्या म्हणाल्या की, "ताबा घेण्याचा प्रयत्न पार्थ पवार कडून त्यांच्याकडून झाला ती सिटोशननडायरी मी त्यांना दिली. १६ जूनला तीथे जाऊन त्यांनी जो धुडगूस घातलाय. त्यामुळे अजित पवार असं म्हणू शकत नाही की तो रद्द केला तो अधिकार त्यांना नाही दोन फ्रेंड व्यक्ती ते करू शकत नाही. जो अजित पवार पालकमंत्री आहे त्यांचा बरोबर वारंवार बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सेमिती आहे. धूडी यांच्यावर माझा विशेष आक्षेप घेतला. कारण धूडी यांना कारवाई करा असे सांगितली होते तर त्यांनी संब्धित अधिकारी याला तर त्यांनी अहवाल मागितला."
"याची कॅापी जर एसजीओ कडे गेली होती तरी कलेक्टर यांनी काही कारवाई केली नाही ते कस्टोडीयन आहेत. ती जमीन आपली आहे असे समजून धुडी यांनी वागणे अपेक्षित होते. कलेक्टर यांनी १४० एकर चा व्यवहार झाला अशी माहिती का दिली नाही. आता त्यांनी चेन करण्याचा प्रयत्न केला. या कलेक्टर यांनी काहीच कारवाई केले नाही. एसजीओ आणि कलेक्टर यांच्यावर कारवाई करा असे मी सांगितले आहे."