Anjali Damania On Ajit Pawar Anjali Damania On Ajit Pawar
ताज्या बातम्या

Anjali Damania On Ajit Pawar : 'आता अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल', नेमंक काय म्हणाल्या? अंजली दमानिया

अमेडिया इंटरप्रायजेस प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय वाद उसळला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करत “आता त्यांना राजीनामा द्यावाच लागेल” असा ठाम दावा केला आहे.

Published by : Riddhi Vanne

(Anjali Damania On Ajit Pawar) अमेडिया इंटरप्रायजेस प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय वाद उसळला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करत “आता त्यांना राजीनामा द्यावाच लागेल” असा ठाम दावा केला आहे. पार्थ पवारांना कोणत्याही प्रकारची क्लिनचिट मिळालेली नाही आणि प्रकरणात अडकलेला प्रमुख आरोपी येवले याचा जामीन हा “सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच” घेतला गेल्याचा आरोप दमानिया यांनी केला. दमानिया यांनी सांगितले की, “जर येवलेला पोलीसांनी अटक केली, तर तो पार्थ पवार यांचं नाव घेईल, अमेडिया इंटरप्रायजेसशी संबंधित व्यवहार उघड करेल. त्यामुळेच त्याला जामीन मंजूर करण्यात आला.” तिने आरोप केला की संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आला असून तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.

याच संदर्भात दमानिया यांनी १६ जून २०२५ रोजी मुंढवा पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीचा उल्लेख केला. त्यांनी त्या दिवशीची नोंद पत्रकारांसमोर वाचून दाखवली. स्टेशन डायरीनुसार दुपारी ४.२८ वाजता अॅडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी पोलिसांना फोन करून बॉटेनिकल गार्डन परिसरात सिक्युरिटी गार्डना प्रवेश नाकारला जात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुंडे आणि पथकाने घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तेथे बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम, महेश पुजारी आणि सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसचे गार्ड उपस्थित होते. त्यांनी पोलिसांना सांगितले की उमेश मोरे यांनी काही लोकांना त्या जागी तैनात केल्याचे सांगितले, मात्र ती जागा अधिकृतपणे बॉटेनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने प्रवेश थांबवण्यात आला होता. याचदरम्यान अमेडियाशी संबंधित व्यक्तींनी कोणतेही कागदपत्र न दाखवता “जागा रिकामी करा” असा दबाव टाकल्याची नोंदही डायरीत करण्यात आली. बाऊन्सरसह दादागिरी केल्याचा आरोप दमानिया यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.

“ही जागा सरकारी ताब्यात असताना अमेडियाचे लोक तिथे बाऊन्सर घेऊन कसे पोहोचले? त्यामागे कोणाचे राजकीय पाठबळ आहे?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. त्यांनी अशीही मागणी केली की १६ जून रोजी संपूर्ण घटना सुरू असताना पार्थ अजित पवार नेमके कुठे होते याचा शोध घेण्यासाठी त्यांचा मोबाइल टॉवर लोकेशन आणि CDR तपासला जावा. दमानिया यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवारांवरील दबाव अधिक वाढत असून विरोधकांनीही या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी सुरू केली आहे. अजित पवार गटाकडून मात्र अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा