ताज्या बातम्या

Soham Bandekar Kelvan : लगीन लगीन घाई झाली आता! बांदेकरांच्या घरी लग्नाची गडबड सुरू, अभिनेत्यांकडून सोहमचं केळवण

आता सोहमच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पारंपरिक केळवण सोहळा आयोजित केला. सोहमच्या मावशांनी, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जिवलग मैत्रिणींनी "आस्वाद" हॉटेलमध्ये सोहमचे केळवण केले. हॉटेलच्या सोशल मीडिया पेजवर याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे,

  • आता सोहमच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

  • सोहमच्या मावशांनी, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जिवलग मैत्रिणींनी "आस्वाद" हॉटेलमध्ये सोहमचे केळवण केले.

(Soham Bandekar Kelvan) महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. सोहम हा अभिनेता आणि निर्माता असून, त्याची जोडी पूजा बिरारी सोबत जुळवली जात आहे. पूजा, स्टार प्रवाहवरील "येड लागलं प्रेमाचं" या मालिकेतील मंजिरीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.

दोघेही कधीच सार्वजनिकपणे त्यांच्या प्रेमाची कबुली देत नव्हते, परंतु दिवाळीनिमित्त पूजा यांच्या पोस्टवर सोहमने केलेली कमेंट आणि गणपती उत्सवातील पूजा बिरारीची उपस्थिती यामुळे अफवा जोर धरू लागल्या. यावरून या जोडीच्या नात्याला अधिक वाव मिळाला.

आता सोहमच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पारंपरिक केळवण सोहळा आयोजित केला. सोहमच्या मावशांनी, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जिवलग मैत्रिणींनी "आस्वाद" हॉटेलमध्ये सोहमचे केळवण केले. हॉटेलच्या सोशल मीडिया पेजवर याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

सोहमच्या केळवणाला अभिनेत्री शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, अभिजीत केळकर आणि पूर्वा गोखले हजर होते. या सोहळ्यात पारंपरिक भोजन होते, ज्यामध्ये वड्यांपासून ते श्रीखंड, मोदक आणि मसाले भात असे विविध पदार्थ होते. केळवणाच्या सोहळ्यात सोहम आणि त्याच्या कुटुंबीयांचे उत्साही स्वागत करण्यात आले. सोहमच्या आगामी लग्नामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा