सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. यंदाच्या निवडणुकीत एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीची आज मतमोजणी होणार असून भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय दुपारी 12 पर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे
भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आता कोणाच्या बाजूने कौल लागतो. याची जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे.