सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 27 तारखेला मतदान होणार असून 28 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून ही निवडणूक रखडलेली होती. निवडणुकीसाठी 25 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे. सोसायटी मतदारसंघ अकरा, ग्रामपंचायत मतदारसंघ चार, व्यापारी मतदारसंघ दोन, हमाल तोलार मतदार संघासाठी एक जागा असणार आहे.