ताज्या बातम्या

Shirish Valsangkar : सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात स्वत:वर झाडल्या गोळ्या

सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपल्या राहत्या घरात डोक्यात गोळी झाडली.

गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने त्यांच्या स्वतःच्या वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोलापूरमधील वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती, तसेच लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनकडून एमआरसीपी ही पदवीही मिळवली होती.

मिळालेल्या अहवालानुसार, डॉ. वळसंगकर हे काही दिवसांपासून तणावाखाली होते, त्यांनी आत्महत्येसारखा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप