सोलापूरकरांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू होणार असून यामुळे सोलापूरच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. स्टार एअरलाईन्स या खासगी विमान कंपनीला BGCA (भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालय) कडून अधिकृत परवानगी मिळाली असून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
या विमानात एकूण 78 आसनांची व्यवस्था असणार असून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ही सेवा सोलापूरच्या दृष्टीने मोठी संधी ठरणार असून उद्योग, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रासही याचा मोठा लाभ होणार आहे.
याआधी काही दिवसांपूर्वीच Fly91 कंपनीने सोलापूर–गोवा विमानसेवा सुरू केली होती. या सेवेचे उद्घाटन हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर आता सोलापूर–मुंबई मार्गावरही विमानसेवा सुरू होणे, हे सोलापूरच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांना लवकरच वेळापत्रक आणि तिकिटांचे दर याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.
हेही वाचा