सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळगी भागातील एका रील स्टारने गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रज्वल कैनूर असे रील स्टारचे नाव आहे. आज हम है, कल हमारी याद होगी असे सोशलमीडियावर पोस्ट टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दुसऱ्या पोस्टमध्ये 'सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेत आहे, माझी आई माझा भावाची काळजी घ्या, इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद झाली आहे..