मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील आंदोलन सुरु असून या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी देण्यात आल्याचे कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर आज पाचवा दिवस असून जरांगेंच मराठा आरक्षणसाठी सुरु असलेल आंदोलन अजून सुरु आहे. त्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील सीएसएमटीवरील वाहतूक कोंडण्यास सुरु झाली, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना पाहायला मिळाला.
हे सगळं लक्षात घेता, जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालयाची काल सुनावणी झाली होती, ज्याची पुढची सुनावणी आज झाली आहे. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यादरम्यान मराठा आंदोलकांवर कठोर कारवाई करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, "आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, त्याचा अहवाल सादर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून काम करू" असे आदेश देत उच्च न्यायालयाने ठणकावले आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "न्यायालयाचे आदेश आहेत न्यायालयाने मुंबईत करावयाच्या अनेक गोष्टी आहेत मराठा आंदोलन आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आहेत. नक्की शिस्त पाळली पाहिजे न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणे गरजेचे असून हे न्यायालयाचा म्हणणं योग्य आहे.
पण हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये आले आहेत घूसखोर आहेत का?. अनेक विषयांवर न्यायालयावर निर्णय होत नाहीयेत. वर्षानुवर्ष न्यायालयाच्या शिवसेना निर्णयावर प्रतिक्षेत आहेत."
राज्य अस्थिर व्हावं, काहींचा प्रयत्न -राऊत
पुढे संजय राऊत म्हणाले की, "जसे भीमा कोरेगाव दंगलीमागे काही शक्ती काम करत होत्या. तसचं अश्या प्रकारचे आंदोलन चिघळावं गावागावात दंगली घडाव्यात, यासाठी मंत्रीमंडळातल्या काही शक्ती काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पक्क माहिती आहे. न्यायालयाला माहिती नसेल, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. हा विषय सरकारच्या खेदारातील असून न्यायालयाच्या नाही."