परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल समोर आला आहे असून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे. न्याय दंडाधिकाऱ्यांचा चौकशीचा अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. परभणीच्या नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला असून सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.