Beed Crime : महाराष्ट्र हादरला! पुण्यानंतर आता बीडमध्ये हुंडाबळीने घेतला जीव  Beed Crime : महाराष्ट्र हादरला! पुण्यानंतर आता बीडमध्ये हुंडाबळीने घेतला जीव
ताज्या बातम्या

Beed Crime : महाराष्ट्र हादरला! पुण्यानंतर आता बीडमध्ये हुंडाबळीने घेतला जीव

बीडमधील गेवराई तालुक्यात राजुरी मळा येथली सोनाली बाळू वनवे हिचा हुंडाबळी प्राण घेतला.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी

नवविवाहितेचा सासरच्या लोकांकडून वारंवार जाच

विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह

गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील घटना

सोनाली वनवेच्या शरिरावर आढळल्या अनेक जखमा

वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजे असताना बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई तालुक्यात राजुरी मळा येथली सोनाली बाळू वनवे हिचा हुंडाबळी प्राण घेतला आहे. सोनाली बाळू आणि अनिकेत गर्जे यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या लोकांनी माहेरच्यांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली होती. तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. मुलीच्या संसारासाठी सोनालीच्या माहेरच्यांनी पाच लाख रुपये नेऊन दिले. दरम्यान आता तू आवडत नाहीस, मला तुझ्या सोबत राहायचे नाही असा वाद घालत नवऱ्यासह सासरच्या लोकांकडून वारंवार त्रास दिला होता.

याबाबतची माहिती सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना दिली होती पण त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासु प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला