South Korea Stampede  Team Lokshahi News
ताज्या बातम्या

South Korea मध्ये पार्टीदरम्यान चेंगराचेंगरी; 149 जण मृत्युमुखी;VIDEO पाहा

दक्षिण कोरियाची राजधानी सियोलच्या बाजारात सुरू असलेल्या हेलोवीन पार्टीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये हॅलोवीन पार्टीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आत्तापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या पार्टीतील 50 लोकांना हृयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तर जवळपास 150 जण यामध्ये जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवलमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी या पार्टीमध्ये सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर अचानक या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे हॅलोवीन पार्टी?

ख्रिश्चन धर्मियांत 31 ऑक्टोबर रोजी हॅलोवीन हा उत्सव साजरा केला जातो. हॅलोवीन हा शब्द 1745 पासून वापरला जातो. पहिल्यांदा हा सण इंग्लंड आणि आयर्लंड येथे साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हा सण जगभर साजरा केला जाऊ लागला. यावेळी मृत व्यक्तींचे आत्मा त्यांना भेटायला येतात असा समज आहे त्यामुळे हॅलोवीन पार्टीत भूतप्रेतांची वेशभूषा केली जाते. पूर्वजांच्या स्मरणासाठी साजरा केल्या जाणाऱ्या पार्टीत नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.


Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Raj Thackeray On MNS Morcha : मोर्चानंतर अखेर राज ठाकरे झाले व्यक्त! माध्यमांशी बोलण्यावर बंदी ; कार्यकर्त्यांना आदेश, नेमकं काय लिहिलं ?

Rajeev Rai Challenges Raj Thackeray : "हिम्मत असेल तर Bollywood ला मुंबईबाहेर काढून दाखवा" राजीव राय यांची राज ठाकरेंना धमकी