शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोयाबीन आणि कापसाचा हमी भाव जाहीर झाला आहे. आता केंद्र सरकारने सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. दरम्यान सोयाबीनच्या हमीभावात 436 रुपये तर कापसाच्या हमीभावात 589 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता खरीप हंगामात 2025-26 मध्ये सोयाबीनला 5 हजार 328 रुपये हमीभाव मिळणार आहे. त्याचप्रमाणे कापसाला 8 हजार 110 रुपये हमीभाव मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले. सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल 436 रुपयांची वाढ केली. सोयाबीनचा हमीभाव आता 5 हजार 328 रुपये झाला आहे. खरिप हंगाम 2025-26 साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी 7 हजार 710 रुपये हमीभाव असणार आहे. तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8 हजार 110 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.
हमीभाव वाढीविषयी केंद्र माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा विचार केला आहे. त्यानंतरच हमीभाव जाहीर केला आहे. मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत मागणी, जागतिक बाजारभाव, पाणी, जमीन याचा विचार करुन आयोगाकडून शिफारस केली जाते.
जाणून घ्या खरीप पिकांचे हमीभाव :
सोयाबीन - 4892 : 5328 - 436
तूर - 4550 : 8000 - 450
बाजरी - 2625 : 2775 - 150
नाचणी - 4290 : 4886 - 596
भूईमूग - 6783 : 7263 - 480
तीळ - 8717 : 9537 - 820