Devendra Fadnavis : "बोलताना भान ठेऊन बोला" मुख्यमंत्र्यांनी टोचलं पडळकरांचे कान  Devendra Fadnavis : "बोलताना भान ठेऊन बोला" मुख्यमंत्र्यांनी टोचलं पडळकरांचे कान
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : "बोलताना भान ठेऊन बोला" मुख्यमंत्र्यांनी टोचलं पडळकरांचे कान

फडणवीस सल्ला: पडळकरांच्या विधानांवर संयम ठेवा, संघर्ष टाळा.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • सांगलीच्या जतमधील अभियंताच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

  • भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली

  • या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे.

  • यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पडळकरांची चांगलेच कान टोचले.

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar Statment : सांगलीच्या जतमधील अभियंताच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे.

तसेच उद्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर ही जतमध्ये सकाळी मतदारसंघात येणार असल्याने उद्या जतमध्ये दोन्ही गटात संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तर जयंत पाटील हे उद्या सकाळी सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की. "कोणाच्याही वडीलांबद्दल किंवा घरच्यांबद्दल विधान करणं योग्य नाहीये. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे. त्यांनाही मी सांगितलेलं की, अशा प्रकारच्या ज्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करत नाही. गोपीचंद पडळकर हे तरुण आणि आक्रमक नेते आहेत. आक्रमता दाखवता त्यांच्या बोलण्याचा कसा अर्थ निघेल यांचा ते विचार करत नाहीत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai To Nanded Special Trains : सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा, मुंबई-नांदेड दरम्यान चार विशेष गाड्या

Election Commission of India : निवडणूक आयोगाची धडक कारवाई; महाराष्ट्रातील 44 सह 474 पक्षांची नोंदणी रद्द

Makarand Anaspure : मराठा-ओबीसी वादावर मकरंद अनासपुरेंचा शांततेचा संदेश; "समाज तुटू नये..."

Navnath Waghmare : ओबीसी मोर्चात नवनाथ वाघमारेंची सुरेश धसांवर टीका; ‘आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल’