पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये असलेले पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पर्यटक माघारी परतत आहेत. यावेळी अनेक विमानसेवा कंपन्यानी आपल्या तिकीटदर वाढविण्यात आल्याने नेटीझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमध्ये आता विशेष विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. तिकीट दर वाढवण्यावर बंदी घालण्यात आली असून रद्दीकरण शुल्काचा संपूर्ण परतावा देखील मिळणार आहे. जम्मू- काश्मीर डीजीसीन महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. आता विशेष विमानसेवा सुरु करण्यात आले आहे.