छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिका 1699 कर्मचाऱ्यांना एक खास भेटवस्तू देणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांला 12,500 रुपये इतके सणउपहार (फेस्टिव्हल अँडव्हान्स) देत एकूण 2.12 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहेत. मुख्य लेख आणि वित्त अधिकारी श्री. संतोष वाहुळे यांनी याबाबत माहिती दिली. मार्च महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना वेळेत अदा करण्यात आले आहे.
नवीन व्यवस्थेनुसार, महापलिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी ॲपद्वारे करणे बंधनकारक केली आहे. या प्रणालीमुळे कार्यालयात प्रत्यक्ष येण्याचे प्रमाण वाढले असून, अर्जित व सामान्य रजेच्या अर्जांमध्येही वाढ झाल्याचे निदर्शनास आले. 31 जानेवारीच्या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर शिस्तीची अंमलबजावणी सुरु असली तरी, श्री. जी. श्रीकांत यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. मार्च महिन्यासाठी कर्मचाऱ्यांसाठीचे नियम शिथिल केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ईदचा सण साजरा करत असताना पालिकेने 362 कर्मचाऱ्यांना एकूण 45.25 लाखांचा फेस्टिव्हल ॲंडव्हान्स दिला होता. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही मदत होती. ही आर्थिक मदत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे प्रतीक आहे.