ताज्या बातम्या

Pritam Munde : बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांची रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाल्या...

बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रीतम मुंडे म्हणाल्या की, 10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या.

१० वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण . संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, १० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असे प्रितम मुंडे म्हणाल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार

Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; हेल्पलाइन नंबरवर अज्ञाताचा कॉल

Pune Mhada Lottery : पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहताय? म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु