ताज्या बातम्या

POP Idols : Special Report POP बंदीमुळे गणेशमूर्ती व्यवसायावर विघ्न!

गणेशमूर्ती व्यवसायावर पीओपी बंदीचे विघ्न! शाडू माती महाराष्ट्रात उपलब्ध नाही, मूर्तिकार चिंतेत; गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर.

Published by : Team Lokshahi

अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापपर्यंत पीओपी बंदी उठलेली नाही आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती घडविणारे मूर्तीकर चिंतेत सापडले आहेत. मूर्तीसाठी शाडूच्या मातीचा जो पर्याय सुचवण्यात आला, तो सुद्धा खर्चिक आहे. कारण शाडूची माती महाराष्ट्रात मिळत नाही आहे. म्हणूनच, या सगळ्या संकटात अडकलेल्या मूर्तिकरांवर नवं विघ्न आले.

महाराष्ट्रात यंदा गणेश मूर्ती साकारण्यासाठी पीओपी वापरता येणार नाही, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काढण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील मूर्तिकारांची झोप उडालीय. याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही आणि गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे करायचे काय? असा सवाल गणेश मूर्तिकार आणि कारखानदार यांना पडलाय. रायगड जिल्ह्यातील पेण म्हणजे बाप्पांचे माहेरघर लाखो गणेशमूर्ती येथे साकारल्या जातात. त्यासाठी मूर्तिकार बँकांकडून कर्ज घेतात. पण पीओपी बंदीमुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, "पीओपीसाठी शाडू मातीचा पर्याय सुचवण्यात आला आहे. मात्र शाडूची माती महाराष्ट्रात उपलब्ध नाही. त्यामुळे ती गुजरातमधून मागवावी लागते. त्यामुळे पन्नास किलोची बॅग चाळीस किलो होते. त्यातच शाडू माती हाताळणारे कारागीर मिळत नाहीयत. त्यामुळे आता इतक्या कमी वेळात शाडू मातीपासून मूर्ती कशा बनवायच्या? अशा चक्रव्यूहात मूर्तिकार अडकले आहेत."

मुर्तिकार सुधाकर नेमाणे त्यासोबत सुयोग मोकल कारखानदार यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी बंदीचा आदेश काढला आणि त्यावर शाडू मातीचा पर्याय दिला. खरंतर त्यावर अद्याप ठोस निर्णयही झालेला नाही. त्यातच हे प्रकरण आता न्यायालयात आहे. एकीकडे शाडूची माती महाराष्ट्रात मिळत नाही. ती आणावी लागते गुजरातमधून आणि गणेशमूर्ती साकरणारे मूर्तिकार आहेत. त्यामुळे पीओपीबंदीचा आणि शाडू मातीचा पर्याय हे निर्णय राजकीय तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात