सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या निवडणुकीत भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडले असून, भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करून निवडणुकीचा रिंगणात उतरले आहेत.
बाईट- सचिन कल्याणशेट्टी, भाजप आमदार
मुख्यमंत्र्यांनी सचिन कल्याणशेट्टी यांना काही सूचना केल्या होत्या. त्यांनी केलेल्या आवाहनामुळेच एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केलाय. असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
बाईट- दिलीप माने, माजी आमदार, काँग्रेस
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचं पॅनल मैदानात उतरलं असलं तरी, त्यांच्याविरोधात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख दंड थोपटले आहेत. भाजपने काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यामुळे सुभाष देशमुखांनी संताप व्यक्त केला आहे.
बाईट:- सुभाष देशमुख, आमदार भाजपा
महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेसमध्ये 36 चा आकडा आहे... तर दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र भाजप आणि काँग्रेसने गळ्यात गळे घातलेयत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.