ताज्या बातम्या

Special Report Pandharpur Wari 2025: पंढरपूर दर्शनात VIP पासचा गोंधळ; भाविकांचा संताप

पंढरपूर दर्शन: व्हीआयपी पासमुळे साध्या भाविकांना ताटकळावं लागतं, संतापाची लाट.

Published by : Riddhi Vanne

ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. महाराष्ट्रासह देशभरातून रोजच्या रोज भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येतात आणि रांगेत उभे राहतात. हरी नामाचा गजर करत रांगेतून पुढे पुढे सरकत राहतात. मात्र हल्ली ऑनलाईन आणि व्हीआयपी पासमुळे साध्या रांगेतील भाविकांना ताटकळावं लागते त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाचूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...

रामकृष्ण हरी म्हणत महाराष्ट्रच काय तर देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. कुणी वाहनाने तर कुणी पायी चालत मजल-दरमजल करत पंढरपुरात येत असतं. मनात ध्यास असतो फक्त विठ्ठलाचा आणि आस असते फक्त विठ्ठलाला डोळे भरून पाहण्याची, त्याच्या पायावर डोकं ठेवायची. पंढरपुरात दाखल झाल्यावर भाविक रांग लावतात. त्यात तासनतास उभे राहतात. हे वर्षानुवर्ष चालत आले आहे. मात्र अचानक याच रांगेत वाद झाला आणि त्यात कळीचा मुद्दा होता, VIP आणि ऑनलाईन पासेस Online passes आहेत.

व्हीआयपी VIP आणि ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांना दर्शन लवकर होतं, त्यामुळे साध्या रांगेतल्या भाविकांना ताटकळत राहावं लागतं, असा आरोप भाविकांनी केला आहे.

भाविक राधेश बादले-पाटील यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे, त्यावेळेस ते म्हणाले की, "विठ्ठलाच्या दर्शन रांगेत झालेल्या वादानंतर मंदिर समितीने काय स्पष्टीकरण दिलंय."

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला, त्यावेळेस ते म्हणाले की," भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावं म्हणून एक समिती नेमण्यात आली आहे मात्र, ही समिती फक्त VIP भाविक आल्यानंतरच मंदिरात येतात, असा आरोप केला जातोय... पण काहीही असो,

विठ्ठलही भक्तांसाठी आसुसलेला आहे. त्यामुळे, सगळ्याच भाविकांना दर्शन सुलभ आणि जलद व्हावं यासाठी मंदिर समितीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण भाविक म्हणतात त्याप्रमाणेच देव सगळ्यांसाठी सारखा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?