ताज्या बातम्या

Special Train : मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यासाठी मुंबईहून विशेष रेल्वे धावणार

नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली असून या सणाच्या निमित्ताने मुंबई- पुण्यात नोकरीला असणारे अनेकजण मूळगावी जातात. नवरात्रीत प्रवाशांची वाढती गर्दी बघता रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • नवरात्रीत प्रवाशांची गर्दी बघता रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर

  • रेल्वे विभागाकडून नवरात्रीनिमित्त काही विशेष रेल्वेगाड्या सुरु

  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या

नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली असून या सणाच्या निमित्ताने मुंबई- पुण्यात नोकरीला असणारे अनेकजण मूळगावी जातात. (Special Train) नवरात्रीत प्रवाशांची वाढती गर्दी बघता रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. रेल्वे विभागाकडून नवरात्रीनिमित्त काही विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नवरात्री स्पेशल ट्रेनबाबत सांगणार आहोत जी मुंबईहून थेट मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला जोडेल. नवरात्रीनिमित्त मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या धावणार आहे.या ट्रेनचे वेळापत्रक आणि कोणकोणत्या स्थानकावर ती थांबणार आहे याबाबत आपण जाणून घेऊयात.

कसं आहे ट्रेनचे वेळापत्रक ?

मुंबई आणि नांदेडला जोडणारी ही ट्रेन (Mumbai Nanded Special Train) क्रमांक 07603 ही रेल्वे 22 ते 29 सप्टेंबर या कालावधीत दर सोमवारी हुजूर साहेब नांदेड येथून रात्री 23:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.तर ट्रेन क्रमांक 07604 ही रेल्वे 23 ते 30 सप्टेंबर दर मंगळवारी या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 16:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा ?

ही विशेष ट्रेन (Mumbai Nanded Special Train) ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या स्पेशल ट्रेनमध्ये 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 6 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 6 शयनयान आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dussehra Melva 2025 : उद्धव ठाकरेंच्या मंचावर राज ठाकरेही येणार? टिझरमधल्या ‘त्या’ वाक्यामुळे चर्चेला उधाण

Gold Rate Increased : सोन्याच्या दरात लाखोंची उडी, सोनं खरेदी करायचं की नाही? ग्राहकांना मोठा फटका

Supriya Sule On PM Modi : "पाच वर्षांपूर्वी निर्णय घेतला असता तर..." जीएसटी उत्सवावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया;

Rohit Pawar On Gopichand Padalkar : "एक बेंटकस कार्यकर्ते...." पडळकरांच्या 'त्या' विधानांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर