Spicejet incident team lokshahi
ताज्या बातम्या

Spicejet वर मोठी कारवाई, 8 आठवड्यांसाठी 50% उड्डाने थांबवली

DGCAने 8 आठवड्यांसाठी Spicejet च्या 50% फ्लाइट्सवर बंदी आणली आहे. या आठ आठवड्यांसाठी Spicejet ची विमाने अतिरिक्त निगराणीखाली ठेवण्यात येईल.

Published by : Team Lokshahi

स्पाईसजेटच्या विमानांमध्ये सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) मोठी कारवाई केली आहे. DGCAने 8 आठवड्यांसाठी Spicejet च्या 50% फ्लाइट्सवर बंदी आणली आहे. या आठ आठवड्यांसाठी Spicejet ची विमाने अतिरिक्त निगराणीखाली ठेवण्यात येईल. दुसरीकडे, Spicejetला भविष्यात 50 टक्क्यांहून अधिक विमानांचे उड्डाण करायचे असेल, तर त्यांच्यांकडे त्यासाठी क्षमता, पायाभूत सुविधा आणि कर्मचारी उपलब्ध असल्याचे सिद्ध करावे लागेल.

DGCA स्पाइसजेटला नोटीस दिली होती. त्यांच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ही नोटीस पाठवली होती. सरकारने राज्यसभेत उत्तर देताना सांगितले की, DGCA ने स्पाइसजेटच्या विमानांचे स्पॉट चेकिंग केले आहे. त्या तपासणीत कोणतीही मोठी त्रुटी सापडली नाही. परंतु डीजीसीएने सर्व प्रकारच्या तांत्रिक बिघाड दूर झाल्यावरच स्पाईस जेटने आपली १० विमाने वापरावीत, असे स्पष्ट केले होते.

8 वेळा तांत्रिक बिघाड

18 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये 8 वेळा तांत्रिक बिघाड आढळून आला. या कारणास्तव डीजीसीएला विमान कंपनीला नोटीस पाठवावी लागली. विमानांमध्ये सातत्याने होत असलेल्या बिघाडामुळे प्रवाश्यांनी तक्रारी केल्या होत्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज