ताज्या बातम्या

Pune : पुण्यात एसआरपीएफ तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 'मिरॅकल ऑफ माईंड' ध्यान सत्राचे आयोजन

एसआरपीएफ पुणे: 'मिरॅकल ऑफ माईंड' ध्यान सत्रात 300 पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला मानसिक आरोग्याचा अनुभव.

Published by : Prachi Nate

ईशा फाउंडेशन आणि आयपीएस नम्रता पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित 'मिरॅकल ऑफ माईंड' ॲप-आधारित मार्गदर्शित ध्यान कार्यक्रमात पुण्यातील 300 एसआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्याचा प्रसार करणारा 7-मिनिटांच्या ध्यानाचा अनुभव करून देण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ईशा फाउंडेशनने पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वरिष्ठ अधिकारी, हवालदार आणि प्रशिक्षणार्थी अशा 300 सदस्यांसाठी आज सकाळी 11 वाजता ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ध्यान अनुभव सत्राचे आयोजन केले. या कार्यक्रमाला एसआरपीएफ ग्रुप-2 च्या कमांडंट आयपीएस नम्रता पाटील यांनी उपस्थिती लावली, त्याचबरोबर त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या सत्रात सहभागींना ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ची ओळख करून देण्यात आली, जो सद्गुरूंनी सुरू केलेला जागतिक मानसिक कल्याण उपक्रम आहे, ज्यात ॲप-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे साधे परंतु प्रभावी 7-मिनिटांचे मार्गदर्शित ध्यान प्रदान केले जाते. या अनुभवाने उपस्थितांवर सखोल प्रभाव पडला, त्यापैकी अनेकांना हे ध्यान अत्यंत शांत आणि ताजेतवाने करणारे वाटले. सभेला संबोधित करताना, आयपीएस नम्रता पाटील यांनी सहभागींना ॲपचा नियमितपणे वापर करण्यास प्रोत्साहित केले. "मला माहित आहे की, तुम्हाला लवकर उठून दोन तास शारीरिक प्रशिक्षण घ्यावे लागते. परंतु आपण जर या ध्यानासाठी सात मिनिटे काढू शकलो, तर त्याचा निश्चितच फायदा होईल. असा प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही," असे त्या म्हणाल्या.

ईशा टीमशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, "मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांसोबत हे 7-मिनिटांचे ध्यान अनुभवले, आणि ते खूपच आरामदायक होते. मार्गदर्शनामुळे ध्यान करताना लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. ध्यानाच्या सुरुवातीला दाखवलेल्या व्हिडिओमुळे या संपूर्ण उपक्रमाचा स्पष्ट संदर्भ मिळाला. मी ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ॲपचा वापर करून हे ध्यान सुरू ठेवेन." त्यांनी पुढे सांगितले की, त्या ग्रुप-1 च्या, तसेच दौंड येथील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना या ध्यानाची ओळख करून देतील.

लाँच झाल्यापासून ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ॲपला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, केवळ 15 तासांत 10 लाख डाउनलोड्स आणि दोन आठवड्यांहून कमी कालावधीत 20 लाख डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे. हे ॲप लाँचपूर्वी लागोपाठ तीन दिवस आयओएस हेल्थ अँड फिटनेस चार्टमध्ये अव्वल स्थानावर होते आणि भारतात मोफत ॲप श्रेणीत टॉप 10 मध्ये आणि अमेरिकेत टॉप 30 मध्ये स्थान मिळवले. मुख्य 7-मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानाव्यतिरिक्त, हे मोफत ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी साधने उपलब्ध करून देते आणि दीर्घकालीन भावनिक संतुलन तसेच स्पष्टता वाढवण्याच्या उद्देशाने सद्गुरूंद्वारे कालातीत अंतर्दृष्टी प्रदान करते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Rupali Chakankar : 'महाराष्ट्रात ब्रम्हा, विष्णु, महेशाचं सरकार, रूपाली चाकणकर यांच्याकडून नेत्यांची देवाबरोबर तुलना

Laxman Hake Controversy : "लक्ष्मण हाकेंची जीभ हासडणाऱ्यास लाखाचे बक्षीस", जरांगेंचे समर्थक संतापले

Mumbai Indians New Name : मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठा निर्णय; संघाचे नाव बदलून नवं नाव ठेवणार, 'एमआय...'