ताज्या बातम्या

Bus Accident Indore : महाराष्ट्रात एसटीचे आत्तापर्यंत झालेले 10 मोठे अपघात!

इंदूरहून (Indore) जळगावच्या दिशेने जाणारी बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बेपत्ता आहेत. ही घटना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील धार (Dhar) येथे घडली.

Published by : Shweta Chavan-Zagade

इंदूरहून (Indore) जळगावच्या दिशेने जाणारी बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बेपत्ता आहेत. ही घटना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील धार (Dhar) येथे घडली. ही बस इंदूरहून जळगावातील अमळनेर येथे येणार होती. दरम्यान तिचा अपघात घडला. अपघाताचे नेमेके कारण अद्यापही पुढे आले नाही. दरम्यान आतापर्यंत एसटी बसला दहा मोठे अपघात झाले आहेत.

एसटी बसला झालेले दहा मोठे अपघात :

१) २० मे २०२२ रोजी चंद्रपूर - मुल महामार्गावर अजयपुर येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. अक्कलकोट कलाप्पावाडी बस पलटी झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला.

२) 9 जून 2022 बीड जिल्ह्यातील लातूर अंबाजोगाई रोडवर ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले तर 15 जण जखमी झाले.३) १९ ऑगस्ट २०१९ रोजी धुळे शिंदखेडा मार्गावरील एसटी बसला अपघात झाला. एसटी आणि ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली. औरंगाबाद येथील शहादा येथे झालेल्या या अपघातात 15 प्रवासी मरण पावले तर वीस जण जखमी झाले.

४) 27 मे 2022 रोजी पालघर जिल्ह्यातील वाघोबा खिंड येथे एक एसटी बस दरीत कोसळली. या अपघातात 15 जण जखमी झाले.

५) 25 ऑक्टोबर 2021 रोजी सोलापूर पुणे महामार्गावर चिखली येथे एसटी बस आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला. एसटी बस कंटेनरवर आढळल्याने आठ प्रवासी जखमी झाले.

६) 9 जानेवारी 2022 रोजी लातूर औरंगाबाद महामार्गावरील बीड सायगाव येथे एसटी बसला अपघात झाला. एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले.

७) 20 जानेवारी 2020 रोजी नाशिक येथे एसटी बसला अपघात झाला. एसटी आणि रिक्षा यांच्या टक्कर झाल्याने एसटी जवळच्या विहिरीत कोसळली एसटीचा टायर फुटल्याने मेशी फाट्याजवळ झालेल्या या अपघातात 25 जण मृत्युमुखी तर 33 जण जखमी झाले होते.

८) 15 मे 2022 रोजी नगर शिर्डी मार्गावरील एसटी बसला मनमाड मार्गावर गुहा पाट नजीक अपघात झाला. एसटी बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाला होता.

९) 28 जून 2018 रोजी पनवेल अलिबाग मार्गावर एसटी बस आणि शिवशाही बसमध्ये भीषण अपघात झाला. कारले खिंड येथे झालेल्या या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले होते.

१०). 26 मे 2022 औरंगाबाद - जालना मार्गावर गाढे जळगाव शिवारात एसटी बस आणि बोलेरो पिक अप यांच्या अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार आणि तीन जण जखमी झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा