ताज्या बातम्या

MSRTC Passenger Scheme : ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी (MSRTC Passenger Scheme) एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) घेतला आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद

  • ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना

  • अनेक प्रवाशांना या मासिक व त्रैमासिक पास योजनेचा फायदा होणार

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) घेतला आहे. त्यानुसार मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना आता राज्यातील ई-बस प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या ई-बस पास योजनांचा मुख्य उद्देश नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. ई-बस प्रकल्पातील ४४८ बस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस सध्या महामंडळाच्या ताफ्यात कार्यरत आहेत. या बसेसची संख्या भविष्यात आणखी वाढवण्याचा मानस आहे. अनेक प्रवाशांना या मासिक व त्रैमासिक पास योजनेचा फायदा होणार आहे. तसेच प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

पास योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

- ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील. (ई-शिवनेरी बससेवा वगळून)

- मासिक पास : (३० दिवस) : २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवसांसाठी पास दिला जाईल.

- त्रैमासिक पास : (९० दिवस) : ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवसांचा पास उपलब्ध होईल.

- सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.

- फरक भाडे नियम : निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, भाड्यातील फरक १००% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा