st bus team lokshahi
ताज्या बातम्या

St Worker Strike | एसटीचा संप सुरूच; आज कोर्टात सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी महामंडळाने त्यांच्याविरोधात न्यायालय अवमान याचिका केली

Published by : Team Lokshahi

एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Worker Strike) अद्यापही सुरूच आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून संप सुरूच ठेवल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी महामंडळाने त्यांच्याविरोधात न्यायालय अवमान याचिका केली आहे. आज, मंगळवारी याप्रश्नी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यांतील ग्रामीण आणि आदिवासी भागांना जोडणाऱ्या एसटीची (st worker) सेवा विस्कळीत असल्यामुळे ग्रामीण भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. एसटी गाड्यांतून शाळा-महाविद्यालयांमध्ये ये-जा करणारे विद्यार्थी, आदिवासी भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या महिला आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व स्तरातील घटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

भिवंडी परिसरातून ठाणे शहरामध्ये येणाऱ्या अनेक नोकरदारांनाही एसटीअभावी रोजगारापासून वंचित रहावे लागले. पर्यायी वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नागरिकांचे अक्षरश: शोषण सुरू आहे. खासगी वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना एसटी भाड्याच्या अडीच ते तीनपटीने पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या विविध कारखान्यांतील कामगार तसेच शासकीय खात्यांमध्ये तात्पुरत्या रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा