सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारी स्टँप ड्युटी माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
यामुळे आता एका साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार असून या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले आहेत.
उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्र या सर्व प्रमाणपत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क लागत होते, आता ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.