आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ही बैठक 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यादरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीकडून मंत्री मंडळासमोर जीआरबाबत माहितीचे सादरीकरण झाले असल्याचे समोर आले. तसेच या बैठकीत मराठा आंदोलकांबाबत घेतलेल्या निर्णयांची देखील माहिती दिली.
त्याचसोबत उपसमितीकडून प्रलंबित मागण्यांवरही प्रकाश टाकण्याचे काम करण्यात आल्याचे या बैठकीद्वारे समोर आले आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तावली जात आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीवर मंत्री छगन भुजबळांनी बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. काल जीआर काढल्याने भुजबळ नाराज झाले असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माघारी परतले. दरम्यान आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले हे जाणून घ्या...
मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत 1 हजार रुपयांची वाढ
लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी अडीच हजार रुपये मिळणार
अनुसूचित जमातीतील 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करणार
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका- 11 प्रकल्पास मान्यता
पुणे मेट्रोवरील दोन नवीन स्थानकांना मंजूरी
"नविन नागपूर" अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार,वित्तीय केंद्र विकसित करणार
पुणे ते लोणावळा लोकल तिसऱ्या,चौथ्या मार्गिका प्रकल्पची तरतूद करणार
ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग राबवणार
वांद्रे उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाला मान्यता
प्रकल्पासाठी 3 हजार 750 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता