ताज्या बातम्या

Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आरोग्य, शिक्षण आणि महिलांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

Published by : Prachi Nate

राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपस्थित लावली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण झाले.

यामध्ये विविध सचिवांनी तासभर सादरीकरण केले तसेच आरोग्य, शिक्षण आणि महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी तातडीने तसे प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देण्यात आले. जलजीवन मिशन, PM स्वानिधी, जिल्हास्थानी कर्करोग सेंटर्स, भारतनेट, शेतकरी, अमृत अशा विविध योजनेत मोठा निधी केंद्र सरकारने दिला. कोणत्या विषयात कोणता विभाग काय आणि कसा पुढाकार घेऊ शकतो, यांचे सादरीकरण झाले.

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंत्रिमंडळ निर्णय - ३ (संक्षिप्त)

1) देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी.

* प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित

(जलसंपदा विभाग)

2) जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता

* जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन

* शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन

(जलसंपदा विभाग)

3) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती

(मदत व पुनर्वसन विभाग)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?