थोडक्यात
मुख्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला.
नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करा.
सर्व अधिकाऱ्यांनी सुट्टी असली तरी फिल्डवर उतरून काम करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
State Chief Minister Devendra Fadnavis' reaction after reviewing the flood situation in Marathwada : मुख्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करा. सर्व अधिकाऱ्यांनी सुट्टी असली तरी फिल्डवर उतरून काम करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुढील दोन दिवस महाराष्ट्राल अलर्ट मोड ठेवून कमीतकमी हाणी होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व होत असताना पुरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याची मानसिकता सरकारची आहे. त्यासाठी सरकारने आदेश दिला आहे की, सरसकट पंचनामे करा, फार कायद्यावर बोट ठेवण्याचे काम करु नका. नागरिकांना त्रास होईल असं कोणीही वागू नका. एकूण नुकसानीची माहिती आल्यानंतर काय मदत करायची यांचा सरकार निर्णय घेईल.