बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने देशव्यापी छाननीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच ही प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्रासह काही राज्यांत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक निवडणूक यंत्रणा त्या कामात असल्याने त्यांना एसआयआरवर लक्ष पेंद्रित करता येणार नाही. त्यामुळे या राज्यांत मतदार फेरछाननी निवडणुकीनंतरच होणार आहे, अशी माहिती मिळतेय.
पुढच्या आठवडय़ात याबाबत घोषणा होणार असून 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोऱया जाणाऱया राज्यांना पहिले प्राधान्य असेल. महाराष्ट्रासह काही राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच ही प्रक्रिया सुरू होईल. त्यानुसार देशातील 12 ते 15 राज्यांत एसआयआरचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात आसाम, तामीळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, प. बंगालचा समावेश असेल. महाराष्ट्रासह काही राज्यांत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक निवडणूक यंत्रणा त्या कामात असल्याने त्यांना एसआयआरवर लक्ष पेंद्रित करता येणार नाही. त्यामुळे या राज्यांत मतदार फेरछाननी निवडणुकीनंतरच होणार आहे.