ताज्या बातम्या

राज्य सरकारचा निर्णय! १० जिल्ह्यांतील ६.३३ लाख शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे ६७५ कोटी

राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला.पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी बुधवारी ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव मदत दिली. आता ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

पुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून सरकारला पाठविण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने बुधवारी मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहा जिल्ह्यातील सव्वासहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये (तीन हेक्टरपर्यंत मर्यादा) देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, आतापर्यंत जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली आहे.

पुणे ५२,९०० ४२,८३,९९,०००

सांगली ४५,८६८ ४२,२५,१६,०००

सातारा २४,७५४ १७,०४,३४,०००

कोल्हापूर ५,८६२ ३,७६,९४,०००

सोलापूर ६५,१६६ ११०,५६,५८,०००

नाशिक ९८,२१० ८९,२०,५०,०००

धुळे ५७,९६४ ५१,०४,१८,०००

जळगाव २७,३७० २७,७६,४०,०००

नगर २,५४,६९१ २९०,९१,३३,०००

नंदुरबार १०७ ६,६८,०००

एकूण ६,३२,८९३ ६७५,४५,१०,०००

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा