ताज्या बातम्या

Maharashtra Tourism : राज्याचं नवं पर्यटन धोरण जाहीर; पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगारनिर्मिती

राज्याचं नवं पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलं आहे. पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

राज्याचं नवं पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलं आहे. पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. पर्यटनवाढीसाठी सरकारचा विशेष प्रयत्न असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण 2024 तयार करण्यात आले आहे. पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 18 लाख रोजगार निर्मिती करणार आहे.

यामध्ये 10 वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ग्रामीण व शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. राज्यात त्यासाठी उच्चतम दर्जाचे शाश्वत व जबाबदार पर्यटन विकसित करुन ग्रामीण भागातील पर्यटन व कृषी पर्यटनास वाव देण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारही देण्याचा निर्णय घेतला आहे.

या धोरणात पर्यटन प्रकल्पांचे आकारानुसार ए, बी आणि सी स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, जीएसटी माफी, वीज दरात सवलत आणि मुद्रांक शुल्कात कपात यासारख्या सवलती देण्यात आल्या आहेत. नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी रोख पारितोषिके आणि सांस्कृतिक आणि कलात्मक चालीरीतींचे पुनरुज्जीवन करण्याचा ही प्रस्ताव आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक