(Ganesh Naik On Bibtya ) सध्या महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यामांशी बोलताना गणेश नाईक म्हणाले की, "जुन्नर आणि शिरूर तालुका विचार करता 82 ठिकाणी ओसाड जागा होत्या,तिकडे ऊस,भाजीपाला,पाणी उपलब्ध झाले,त्यामुळे जंगल परस्थिती झाली. सुरुवातीला इतर प्राणी ससे लांडगे कोल्हे होते त्यामुळे बिबट्या येत नव्हता पण आता यायला लागला आहे,आता प्रजनन होते,ऊसतोड झाली की हल्ले वाढले आहेत. बिबट्या पकडण्यासाठी 200 पिंजरे आहेत ते वाढवून 1 हजार केले जाणार आहे."
"कुत्रे,बकरी नाहक बळी द्यावा लागतो,याबाबत प्राणी मित्र आक्षेप घेतात. बकरी आणि कुत्रे सुरक्षित ठेवून त्याची कारवाई केली. लोकल लोकांना या मोहिमेत घेतले जाणार असून ए आय माध्यमातून काही कॅमेरे लावले जाणार,बिबट्या आला की सायरन वाजवले जाणार आहेत. 11 कोटी रुपये यंत्रणा पुणे जिल्ह्याकरता उभारली जाणार अशीच अहिल्यानगर मधेही यंत्रणा देणार,नाशिक कुंभमेळामुळे सुरक्षित आहेत. युद्ध पातळीवर बिबट्या हल्ल्याबाबत निर्णय घेतले जाणार असून जीवितहानी होणार नाही यांची काळजी घेतली जाणार आहे."
"बकरी हे बिबट्या खाद्य केले जाणार,लोकांना जागरूक केले जाणार,शेळ्या जंगलात सोडून देऊन हल्ले कमी होतील. वनतारालाही काही बिबट्या दिले जाणार,याबाबत हालचाल सुरू आहे,10 बारा दिवसात वनतारा मध्येही पाठवले जातील,आफ्रिका जंगलात पाठवले जातील. नगर जिल्ह्यात वनक्षेत्र 9 टक्के आहे म्हणजे कमी आहे, ताडोबा प्रकल्प आहे तिकडेही नवीन जातीचे बांबू आहेत,60 फूट भिंत केले जाणार, बाबू तीन वर्षाने कापले जाणार असून बिबट्याना नसबंदी करण्याची परवानगी मिळाली आहे."
थोडक्यात
जुन्नरमधील बिबट्यांची नस बंदी केली जाणार…..
नस बंदीसीठी केंद्राने दिली परवानगी....
बिबट्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाचा निर्णय....