नंदुरबामध्ये एका रिक्षाने दुचाकीला धडक दिल्यानंतर दोन गटात वाद निर्माण झाला. यामुळे नंदुरबारमध्ये मध्यरात्री दगडफेकीची घटना घडलीय. या किरकोळ वादानंतर निर्माण झालेल्या अफवांमुळे दगडफेकीची घटना झाल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी वाद नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून जमावावर अश्रूधुरांचा मारा करण्यात आला. दगडफेकीच्या घटनेमुळे नंदुरबार शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नंदुरबार शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
नंदुरबार शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.