Ahilyanagar : 'प्री-वेडिंग' बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद...; हगवणे प्रकरणानंतर अहिल्यानगरात मराठा समाजाचे आचारसंहिता संमेलन Ahilyanagar : 'प्री-वेडिंग' बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद...; हगवणे प्रकरणानंतर अहिल्यानगरात मराठा समाजाचे आचारसंहिता संमेलन
ताज्या बातम्या

Ahilyanagar : 'प्री-वेडिंग' बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद...; हगवणे प्रकरणानंतर अहिल्यानगरात मराठा समाजाचे आचारसंहिता संमेलन

अहिल्यानगर: मराठा समाजाच्या आचारसंहिता संमेलनात साधेपणाने विवाह सोहळे साजरे करण्याचे आवाहन.

Published by : Riddhi Vanne

Ahilyanagar Maratha Samaj Wedding instructions : सध्या महाराष्ट्रात हुंडाबळी वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलेले अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आले होते. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप मृत वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

त्यानंतर अनेक घटना महाराष्ट्रातून पाहायला मिळत आहेत. मराठा समाजामध्ये विवाह सोहळे थाटामाटात न साजरे करता साधेपणानं पार पाडण्याची जनजागृती सुरू झालीये. याच पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने मराठा लग्न आचारसंहिता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं

मराठा समाजाची लग्न सोहळ्याची आचारसंहिता नेमकी काय आहे, वाचूया...

  • लग्न सोहळा 300 ते 500 लोकांत व्हावा

  • साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी करावं

  • प्री-वेडिंग प्रकार बंद करावा

  • कर्ज काढून लग्नात खर्च नको

  • लग्नात डीजे नको, पारंपारिक वाद्य वापरा

  • नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्यांना आवरा

  • फक्त वधूपिता, वरपिता या दोघांनाच फेटे बांधावे

  • आहेर रोख स्वरूपात करावा किंवा पुस्तकं द्यावी

  • भोजनात 5 पेक्षा जास्त प्रकार नसावेत

  • लग्न सोहळा 300 ते 500 लोकांत व्हावा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hindustani Bhau On Mahadevi : महादेवी हत्ती प्रकरणावर हिंदुस्तानी भाऊची टीका! शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया, "कोल्हापुरात येऊन दाखव..."

Chandrapur Accident : चंद्रपूरात भरधाव बस पलटली! चालकासह दोघांचा मृत्यू, तर 8 गंभीर जखमी

IND vs ENG Mohammed Siraj : 'डीएसपी', 'मियां' आणि 'मियां मॅजिक'नंतर सिराजला पडलं आणखी एक टोपणनाव! इंग्लंडचे खेळाडू 'या' नावाने संबोधतात

Aaditya Thackeray On Eknath Shinde : "कबुतरं म्हणजे शिंदेंचे आमदार नाही"; आदित्य ठाकरेंकडून शिंदेंच्या आमदारांवर शाब्दिक वार