Rain Update 
ताज्या बातम्या

Rain alert : ऐन ऑक्टोबर हिटमध्ये घामा ऐवजी पावसाच्या धारा

ठाण्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी पुढील ४८ तासांकरिता 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • ठाण्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

  • दिवाळीनंतर लगेचच पावसाने जोरदार हजेरी

  • गायब झालेला पाऊस पुन्हा आला

ठाण्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी पुढील ४८ तासांकरिता 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. राज्यामध्ये शुक्रवारी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर आता पुढचे दोन दिवस देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मुंबईसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भामध्ये वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवाळीनंतर लगेचच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा पुढील चार दिवस उत्तर दिशेला सरकणार आहे. त्याचा परिणाम राज्यामध्ये कोकण किनारपट्टी लगतचे घाट क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाच क्षेत्र निर्माण झाल आहे. या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जेव्हा कमी होईल. तेव्हा राज्यामध्ये हवामान कोरडे होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

गायब झालेला पाऊस पुन्हा आला

गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली. मोठी पडझड झाली. झालेल्या नुकसानातून वर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक वैतागले आहेत. त्यात आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह बीड नांदेड धाराशिवर जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा