Titwala
Titwala team lokshahi
ताज्या बातम्या

विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मारहाण; हाताला गंभीर दुखापत, टिटवाळा परिसरातील घटना

Published by : Shubham Tate

कल्याण (अहमजद खान) : दोन विद्यार्थ्यामध्ये वाद झाला यानंतर तक्रार शिक्षकेकडे गेली. शिक्षिकेने यामधील 15 वर्षाच्या मुलाच्या हातात काठीने मारलं. या मारहाणीत त्याचा हात फ्र्क्चर झाल्याची घटना टीटवाळा येथील शंकुतला विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून टीटवाळा पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रिया सिंग अस या शिक्षिकेचं नाव आहे. तर शाळा प्रशासनाने देखील या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करण्यात येईल अस स्पष्ट केलं आहे.

काल दुपारी शाळेत असताना दिनेश (नाव बदलले आहे) या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला धक्का दिला. याचा जाब विचारणाऱ्या त्या विद्यार्थ्याने आपल्याला शिवी दिल्याची तक्रार शाळेतील शिक्षिका प्रिया सिंग यांच्याकडे केली. यानंतर प्रिया यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना बोलावत विचारणा केली. त्यानंतर संतापलेल्या शिक्षिकेने या विद्यार्थ्यांच्या हातावर काठीने मारलं. या मारहाणीत काठीचा फटका विद्यार्थ्याच्या मनगटावर बसल्याने त्याच्या मनगटाचे हाड फ्रक्चर झाले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारी नंतर टिटवाळा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या शिक्षिका प्रिया सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्याच्या पालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासा अंती शिक्षीकेविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तर शंकुतला विद्यालय प्रशासनाने पालकांची तक्रार आली आहे या प्रकरणी चौकशी करण्यात येईल चौकशी अंती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...