ताज्या बातम्या

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार; देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. गट ब आणि क पदांची जाहिरात लवकरच निघणार असून एमपीएससीच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला आहे.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती.

आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!