'Such a big accident but not a single paper was burnt...' Amol Mitkari questions Ajit Pawar's accident  
ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : 'एवढा मोठा अपघात पण एकही कागद जळाला नाही...' अजित पवारांच्या अपघातावर अमोल मिटकरींचा सवाल

बारामतीत वातावरण अत्यंत शोकाकुल झाले असून पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावर आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

Published by : Riddhi Vanne

Amol Mitkari On Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी (दि. 28) सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे 8.45 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान कोसळले, या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबर यांचा समावेश आहे. अजित पवार हे 66 वर्षांचे होते. या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली बारामतीत वातावरण अत्यंत शोकाकुल झाले असून पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावर आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

अमोल मिटकरी यांनी नेमकं काय लिहिलं आहे पोस्टमध्ये...

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले 😢

त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.

आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.

मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?

• सहावी व्यक्ती कुठे गेली?

• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?

• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???

• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.

थोडक्यात

  • राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले.

  • आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे.

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा