ताज्या बातम्या

Sudhir Mungantiwar: जनतेच्या हितासाठी एकत्र येणे महत्त्वाचे, मविआवर मुंनगटीवारांच परखड विधान

सुधीर मुंनगटीवार यांचे मविआवर परखड विधान: जनतेच्या हितासाठी एकत्र येणे महत्त्वाचे, कार्यकर्त्यांना मन जिंकण्याचे आवाहन.

Published by : Prachi Nate

सुधीर मुंनगटीवार यांनी माध्यमांसोबत चर्चा करत असताना त्यांनी म्हटलं आहे की, माननीय जे.पी.नड्डा, अमित शाहा त्याचसोबत नितीन गडकरी हे तीन प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ 15 हजार कार्यकर्ता महाराष्ट्रातून येतील. एक संदेश घेऊन जातील, आमची संघटना ही केवळ निवडणुक जिंकण्याचं मशीन नसलं पाहिजे.... ही लोकांची मन जिंकणारी संघटना असली पाहिजे... निवडणुकीत कधी हार होते कधी जीत होते पण जिंकण असो किंवा हरणं त्यात मी किंचित देखील भयभीत नाही अशी मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये असावी...

भाजपचं लक्ष निवडणूक नव्हे, तर लोकांची मन जिंकणं - सुधीर मुंनगटीवार

निवडणुक जिंकण आमचं लक्ष नाही, तर लोकांची मन जिंकण हे आमचं लक्ष आहे... त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्या मनापर्यंत पोहचल्या पाहिजे... त्यासाठी सदस्यता नोंदणी अभियान करतं महाराष्ट्रात दीड करोड सदस्यता करण्याचा पक्षाने विचार केला आहे... ते 1 करोड 50 लाख महाराष्ट्रातील शिवभक्तांना भाजपसोबत जोडण्याचा जो कार्यक्रम सुरु आहे त्याच्याबद्दल विश्लेषण होईल...

तुमची एकता ही जनतेसाठी असावी कोणाला अद्दल घडवण्यासाठी नाही...- सुधीर मुंनगटीवार

ज्यावेळेस तुम्ही विचाराने एकत्र न येता केवळ सत्तेसाठी एकत्र होता, विश्वास घात करण्यासाठी एकत्र येता, कोणाला तरी अद्दल घडवण्यासाठी एक येत असाल, तर तुम्ही जास्त दिवस एक नाही राहु शकत... जर तुम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र येत असाल, अशा वेळेस जनतेच्या हितात तुमचं हित हे महत्त्वपुर्ण नसतं.. आणि जर तुम्ही कोणाला तरी अद्दल घडवण्यासाठी एकत्र आला असाल, तर तुमचं हित महत्त्वपुर्ण होऊन जात....

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर