Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Team Lokshahi
ताज्या बातम्या

बोनससाठी स्पष्ट नकार देणा-या अजित पवारांचा खरा चेहरा उघड- सुधीर मुनगंटीवार

Published by : shweta walge

अनिल ठाकरे,चंद्रपूर :- धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या सरकारचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विधानसभागृहात धानाला बोनस देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता आणि या सरकारने धानाला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रिक टन धान खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे. सातत्याने आर्थिक हालअपेष्टा सहन करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला महाविनाश आघाडीने सतत पाने पुसली पण आमच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं