ताज्या बातम्या

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळी झाडून हत्या

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जयपूरमधील श्याम नगर जनपथ येथील घरी हत्या करण्यात आली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जयपूरमधील श्याम नगर जनपथ येथील घरी हत्या करण्यात आली. सध्या या हत्याकांडाची जबाबदारी राजस्थानच्या रोहित गोदरा टोळीने घेतली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

माहितीनुसार, एकूण तीन हल्लेखोर स्कूटरवर बसून तेथे आले होते, अशी माहिती मिळाली आहे. गोगामेडी यांना भेटायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर ते खोलीत गेले आणि तेथे बसून सुमारे 10 मिनिटे गोगामेडी यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर हा गोळीबार झाला.

गोळ्या झाडल्यानंतर गोगामेडीच्या गार्डनेही गोळीबार केला. या क्रॉस फायरिंगमध्ये एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. नवीन शेखावत असे त्याचे नाव सांगण्यात येत आहे. अन्य दोन हल्लेखोर तेथून पसार झाले आहेत.

दरम्यान, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी रोहित गोदारा टोळीने घेतली आहे. ही टोळी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. दुबई प्रकरणाच्या काही महिन्यांपूर्वी रोहित गोदाराने गोगामेडी यांनाही धमकी दिली होती. रोहित गोदरा हा कुख्यात गुंड असून तो सध्या भारतातून फरार आहे. एनआयए त्याची चौकशी करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?