उन्हाळा आला की, सर्वानाच आंबे खाण्याची इच्छा होते. आंब्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. यापैंकी एक पदार्थ म्हणजे आंबा पोळी. तुम्ही घरच्या घरी आंबा पोळी बनवून वर्षभर आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात वर्षभर टिकणारी आंबा पोळी कशी बनवायची.
साहित्य
आंब्याचा रस- 1 कप
3- कप साखर
मीठ- चवीनुसार
लिबांचा रस- 3 ते 4 थेंब
पाणी- 1/4 कप
कृती
आंब्याची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आंबा 1 तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर आंब्याची साल काढून त्याचे बारीक-बारीक तु़कडे करुन त्याची मिक्सरमध्ये बारीक प्युरी करुन घ्या.
एका कढईमध्ये 1/2 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम होताच त्यामध्ये आंब्याची बारीक प्युरी टाका. थोडावेळ मंद आचेवर शिजवा. त्यानंतर त्यामध्ये साखर, मीठ आणि लिबांचा रस घाला आणि सर्व मिश्रण सतत हलवत मंद आचेवर शिजवा. शिजलेल्या आंब्याचे मिश्रण गडद आणि घट्ट होईल, तेव्हा गॅस बंद करुन थोड थंड होऊ द्या. एका ट्रे मध्ये सर्व मिश्रण टाकून तो ट्रे गच्चीत ठेवा. ट्रे मधले मिश्रण चांगले वाळवण्यासाठी उन्हात ठेवा. ज्या वेळेस आंब्याची पोळी पुर्णपणे सुकेल, तेव्हा त्याचे छोटे- छोटे स्लाईसमध्ये कापून घ्या. आता तुमची वर्षभर टिकणारी आंबापोळी तयार आहे.