Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

संजय राऊतांना न्यायालयाचे हजर राहण्याचे समन्स

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात Sanjay Raut यांना समन्स

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात माझगाव न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 4 जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

मेधा किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यानंतर किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी. अन्यथा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर किरीट सोमय्या व मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटीचा दावा दाखल केला होता.

यावर सुनावणी करताना संजय राऊत यांनी केलेली वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. शिवाय प्रसारमाध्यमांमध्ये वाचले जातील अशा पध्दतीने करण्यात आली. यामुळे तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल अशा पध्दतीची ती वक्तव्ये असल्याचेही सिध्द केले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभालीच्या प्रकल्पाल शंभर कोटींचा घोटाळा केला व यात किरीट सोमय्या व त्यांचे कुटूंबिय चालवत असलेल्या युवा प्रतिष्ठानचा संस्थेचा सहभाग असल्याचे वक्तव्य संजय राऊत केले होते.

दरम्यान, राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यामध्ये भाजपाचे दोन, शिवसेनेचे एक, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी उमेदवाराने विजय मिळवला. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा