Sunetra Pawar vs Supriya Sule 
ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर, बारामतीत रंगणार 'नणंद विरुद्ध भावजय' सामना

संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसांत सुरु होणार असून सर्वच पक्ष उमेदवार घोषित करत आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांना बारामतीची लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी जोरदार लढत रंगणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलीय.

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून भिगवन चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला बारामतीकर जोरदार प्रत्युत्तर देतील आणि सुप्रिया सुळे अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी पुरंदरमध्ये व्यक्त केला आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रवादीसह महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे मी आभार मानते. विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढणार असून बारामतीप्रमाणेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यावर भर असेल, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत