उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवार आज सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या निर्णयामुळे पवार कुटुंबातील मतभेद पुन्हा चर्चेत आले असून, शपथविधी इतक्या घाईत का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या कोअर टीमने सुनेत्रा पवार यांना गटनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झटपट घेतला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा चर्चा थांबवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी या प्रक्रियेला पुढे नेल्याची माहिती आहे.
दरम्यान, बारामतीतील रक्षा विसर्जनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्याशी अद्याप भेट न घेतल्याचेही बोलले जाते. त्यामुळे संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
थोडक्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग
काही दिवसांतच नेतृत्वाबाबत हालचाली; आज सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
पक्षातील अचानक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत
शपथविधी इतक्या घाईत का पार पडतोय, याबाबत प्रश्नचिन्ह
या निर्णयाचा पक्षातील समिकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष