ताज्या बातम्या

विधानसभा अध्यक्षांविरोधात सुनील प्रभूंची तक्रार 'शिंदे गटाला झुकतं माप...'

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे गटाला झुकतं माप देतायत, अशा आशयाच तक्रारीचं पत्र ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी विधानभवनाला लिहीलं आहे.

Published by : shweta walge

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे गटाला झुकतं माप देतायत, अशा आशयाच तक्रारीचं पत्र ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी विधानभवनाला लिहीलं आहे. तसेच साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार अपात्रताप्रकरणी आजच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची साक्ष होणार आहे. 21 जूनच्या बैठकीसाठी बजावलेल्या व्हिपवरून काल दिवसभर प्रभूंना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेरलं. व्हिप बजावण्यातच आला नव्हता असा दावा काल सुनावणीदरम्यान महेश जेठमलानींनी केला. त्यावर उत्तर देताना प्रभूंनी तो दावा फेटाळला. आता आजच्या उलटतपासणीतही या व्हिपच्या सत्यतेवरूनच प्रश्नांचा रोख राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनावणीच्या संथगतीवर काल विधानसभा अध्यक्षांनी नाराजीही व्यक्त केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा