ताज्या बातम्या

'मला मंत्री करण्याची इच्छा अजित दादांची' सुनील शेळकेंच वक्तव्य

मला मंत्री करण्याची इच्छा अजित दादांची असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी सांगितले आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचं नाव असल्याने उत्सुकता वाढली आहे.

Published by : shweta walge

मला मंत्री करण्याची इच्छा अजित दादांची ही आहे. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी असं म्हणत आणखी उत्सुकता वाढवली आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचं नाव आहे. भाजप, शरद पवार गट, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे यांसह विविध संघटनांच्या मावळ पॅटर्नवर शेळके भारी पडलेत. शेळके एक लाख आठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्यानं अजित दादा त्यांना मंत्री पदाचं बक्षीस देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना सुनील शेळके म्हणाले, ” माध्यमांमध्ये मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या पाहिल्या. परंतु मी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्यांकडे माझी व्यक्तिगत इच्छा व्यक्त केलेली नाही. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. या पक्षातील प्रमुख नेत्यांना पहिले मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जाईल.

त्यानंतर नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे अशा पद्धतीची काही माहिती मला मिळाली आहे. मात्र, उद्याच्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळाली तर माझ्या पक्ष संघटनेकरता तालुक्याच्या विकासाकरिता अधिकच योगदान किंवा अधिक काम करण्याची माझी तयारी असणार आहे”, असे शेळके यांनी म्हंटले आहे.

राज्यात गुरूवारी मुख्यमंत्री आणि काही मंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. अद्याप शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. तर पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातून मावळ पॅटर्न मोडीत काढून विक्रमी मतांनी विजयी होणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सुनील शेळके यांना देखील मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आता सुरू आहेत. अशातच मला मंत्री करण्याची इच्छा अजित दादांची ही आहे, असं म्हणत  मावळचे आमदार सुनील शेळकेंनी आणखी उत्सुकता वाढवली आहे. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Supreme Court Order On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश; नियम मोडल्यास 25 हजार ते 2 लाख दंड

Pune Municipal Elections : पुणे महापालिका निवडणूक प्रक्रिया पुन्हा रखडली; प्रभाग रचना जाहीर होण्यास विलंब

Kokilaben Ambani : मुकेश अंबानी यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू