5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाही. हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य न करता पाचवी पासून पर्यायी ठेवावी अशी आमच्यासह सर्वांचीच भूमिका राहिली आहे याबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे या मोर्चामुळे वेगळं काहीतरी राजकीय घडेल, राजकीय ध्रुवीकरण होईल असं मला वाटत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी व्यक्त केलं आहे. हा मोर्चा विरोधी पक्षांचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही नेता यात सहभागी होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या भावना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे मांडेल असंही तटकरेंनी स्पष्ट केल आहे.